एमपीसी न्यूज – दहा लाखांची खंडणीची मागणी करत बाप लेकाला मारहाण करण्यात आली (Alandi)आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास नगरपरिषद चौक, आळंदी येथे घडली.
वसीम हुसेन शेख (रा. चार नंबर शाळेजवळ, आळंदी) आणि अमोल हंबीर (रा. काळे कॉलनी, आळंदी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत राहूल सुरेश चोरडिया (वय 48, रा. काळेवाडी, आळंदी) यांनी शुक्रवारी (दि. 19) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Khed : दोन पिस्तूल व दोन जिवंत कडतुसासह दोघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास नगरपरिषद चौक, आळंदी येथील हॉटेल सम्राटमध्ये आले. त्यांनी फिर्यादी चोरडिया यांना मला आजच दहा लाख रुपये द्यायचे, नाहीतर मी तुला आजच मारून टाकणार असे धमकावले. तसेच शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे फिर्यादी यांचा मुलगा त्यांना सोडविण्यासाठी आला. त्यावेळी आरोपी अमोल याने त्यास हाताने मारहाण करीत दोघांनाही वारंवार मारून टाकण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.