Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 12:39 am

MPC news

Congress : शहर काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी मयूर जयस्वाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  वरिष्ठ उपाध्यक्षपदी मयूर जयस्वाल यांची निवड (Congress)करण्यात आली. या निवडीचे पत्र शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते देण्यात आले.

मयूर जयस्वाल हे मागच्या पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.याआधी ते चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ,सोशल मीडियाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत होते. मयूर जयस्वाल यांच्या निवडीने अनेक जुने – नवीन कार्यकर्ते पक्ष संघटनेमध्ये येतील व कार्यरत राहतील चिंचवड मधील अनुभवी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

Pimpri : शहराची औद्योगिक क्रांती करण्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटोची महत्वाची भूमिका – शरद पवार

यावेळी मयूर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देत सर्व वरिष्ठांचे आभार मानत आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकींना सामोरे जाईल, असे म्हटले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर