एमपीसी न्यूज – श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करत तिचा छळ केल्या प्रकरणी एका 30 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चीड अनणारी घटना वाकड येथील हॉटेल टीप टॉपच्या मागे घडली आहे.
याप्रकरणी लवलेश राम प्रसाद तिवारी (वय 29 रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चिरंजित निशीकांत बिस्वास (वय 30 रा. प. बंगाल) याच्या विरोधाात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
POSCO Act : निगडीत अल्पवयीन गतीमंद मुलीवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वॉचमन असून ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना आरोपी हा 8 ते 10 महिन्याच्या श्वानाला उचलून घेवून घेला. त्याने टीप-टॉप हॉटेलच्या मागे जावून पीडित श्वाचा छळ करत त्याच्यावर लैंगीक अत्याचार केले. यावरून हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंधीत कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.