एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या हुक्का पार्लर चालवणाऱ्या(Hinjewadi)दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी भटेवरा नगर, हिंजवडी येथे गुरुवारी (दि. 18) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बेल बॉटम हॉटेल येथे करण्यात आली.
सुमित भिकनराव संधानशिव (वय 26, रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि राजनकुमार रॉय (रा. हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके यांनी शुक्रवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बेल बॉटम हॉटेलचे मालक आरोपी सुमित व स्टाफ याने आरोपी राजनकुमार याच्याकडे हॉटेलचा कोणताही परवाना नसताना खाद्यपदार्थांसोबत हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच हुक्कासाठी लागणारे साहित्य तसेच शेगडीमध्ये कोळसा पेटवून कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.