एमपीसी न्यूज -गेल्या दहा वर्षापासून आयोजित केली जाणारी ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणजे आपल्या आवडत्या नेत्याचा (Pune)वाढदिवस कसा साजरा करावा याचा वस्तुपाठ आहे. एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणे हे जिकरीचे काम असून खेळाडूंना निमंत्रित करणे त्यांची सोय करणे, इतर व्यवस्था करणे हे मोठे काम असते. अजितदादांना खेळाची आवड असून ऑलम्पिक, कबड्डी इत्यादी संस्थांमधून खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी देण्याचे काम ते करत असतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे कष्ट परिश्रम हे वाखाण्याजोगे असून सर्वच खेळाडू अभिनंदनास पात्र आहेत. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना अजितदादांनी युवकांसाठी, खेळाडूंसाठी, महिलांसाठी ऐतिहासिक योजना मांडल्या आहेत. दादांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
Pune : मायक्रोसॉफ्टच्या बिघाडामुळे पुणे विमान तळावरील 40 विमाने रद्द
या प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू व सिने अभिनेता पै. अमोल लंके, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एशियन सायकलींग कॉन्फडरेशनचे महासचिव ओंकार सिंग, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग, रा.काँ. पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, बारामती सह. बॅंकेचे चेअरमन सचिन सातव, रा. काँ. पक्ष बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, रा.काँ. पक्ष पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे, माळेगांव सह. साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, माळेगांव सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, छत्रपती सह. साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, बारामती रा. काँ. पा. चे शहराध्यक्ष जय पाटील, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानद ॲड. सचिव संदीप कदम यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात अंतर व नोंदवलेली वेळ)
1. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय स्तर (१२२ कि.मी.) स्पर्धेमध्ये एअर फोर्सच्या मनजित सिंग (२.३३.५५) याने प्रथम क्रमांक, पुण्याच्या सुर्या थत्तु (२.३७.६०) याने द्वितीय क्रमांक तर विजयपूरचा श्रीशैल विरापुर (२.३९.२७) याने पटकावला.
2. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राज्य स्तर – १२२ कि.मी. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या सिद्देश पाटील याने (२.३७.३१) पुण्याचं हनुमान चोपडे याने द्वितीय क्रमांक (२.३८.२९) याने आणि तृतीय क्रमांक जतच्या दत्तात्रय चौगुले (२.३८.३५) याने प्राप्त केला.
3. सासवड ते बारामती (एमटीबी) सायकलची खुली पुरूषांसाठी राज्य स्तर – ८५ कि.मी. स्पर्धेमध्ये पुण्याच्या आर्यन मरळ (२.२०.३०) याने प्रथम क्रमांक, पुण्याच्या ओंकार खेडकर (२.२२. १४) याने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक नाशिकच्या शिवाजी पारधी (२.२२.४०) याने पटकावला.
4. सासवड ते बारामती (राज्य शासन कर्मचारी) राज्य स्तर रोड सायकल स्पर्धा ८५ कि. मी. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरीच्या प्रसाद आळेकर (२.१०.४०) द्वितीय क्रमांक दीपक गुमने (२.२२.३६) याने तर तृतीय क्रमांक मुबंईच्या मारुती जागझापे (२.२२.४१) याने प्राप्त केला.
5.माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीय स्तर – १५ कि.मी. स्पर्धेमध्ये बगलकोटची गंगा दनदिन हिने प्रथम क्रमांक, सांगलीच्या योगेश्वरी कदम हिने द्वितीय क्रमांक तर बगलकोटची सौमय्या अंतापूर हिने तृतीय क्रमांक पटकवला.
राष्ट्रीय स्तरावर ‘घाटाचा राजा’ हा किताब सूर्या थत्तु (२७.५४) याने तर राज्य स्तरावर कोल्हापूरच्या सिद्देश पाटील (५८.२०) यांनी पटकवला
या राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेमध्ये देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 292 खेळाडू – सायकलपटू सहभागी सहभागी झाले होते.
दरम्यान गदिमा सभागृहात जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘गितोंका का सफर’ हा मराठी, हिंदी गाणी व नतीयांचा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन अमृता खराडे, अशोक लोणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रा.काँ. पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.