एमपीसी न्यूज – राजनंदगाव, छत्तीसगड येथे होणार्या दुसर्या हॉकी इंडिया ज्युनियर (Pune )पुरुष आणि महिला पश्चिम विभागीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी महाराष्ट्रची मुले आणि मुली संघाची धुरा अनुक्रमे नागपूरचा फॉरवर्ड विशाल मंदाडे आणि कोल्हापूरची सानिका माने हिच्याकडे सोपवण्यात आली आहे.
ऑल-प्ले-ऑल लीग फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणार्या मुले गटात हॉकी महाराष्ट्र संघ हॉकी मध्य प्रदेश, हॉकी राजस्थान, हॉकी छत्तीसगड, हॉकी गुजरात, गोवा हॉकी संघांशी दोन हात करेल. अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात खेळतील.
मुलींचा विभाग दोन गटात विभागला गेला असून लीग कम नॉनआउट फॉरमॅटनुसार प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यातील दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरतील. हॉकी महाराष्ट्रचा ब गटात समावेश असून गटात दादरा आणि नगर हवेली, दीव आणि दमण, गोवा हॉकी आणि हॉकी राजस्थान असे अन्य संघ आहेत.
सलामीच्या लढतीत, रविवारी 21 जुलै 2024 रोजी मुलांचा संघ यजमान छत्तीसगडशी खेळेल, तर मुलींचा संघ गोव्याशी झुंजेल.
मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे झालेल्या 15 दिवसांच्या निवडचाचणी आणि कंडिशनिंग शिबिरातून त्यांच्या रवाना होण्यापूर्वी ऑलिंपियन अजित लाक्रा आणि विक्रम पिल्ले यांच्या देखरेखीखाली मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे संघांचे 15 दिवसांची निवडचाचणी वजा कंडिशनिंग शिबिर घेण्यात आले.
संघ –
मुले: वेदांत रहाटे (मुंबई); साहिल वैद्य (वर्धा); गौरव पाटील (कोल्हापूर); गोपाळ मेटकर (नांदेड); रवी भराडिया (मुंबई); हर्ष राक्षे (मुंबई); ख्रिस्टियानो कोरीया (मुंबई); पियुष गायकवाड (सातारा); शॉन डेमेलो (मुंबई); संतोष बिराजदार (सांगली); रणज्योतसिंग हजूरिया (नांदेड); शंकर कुसळे (पुणे); अर्जुन हरगुडे (पुणे); विशाल मंदाडे (नागपूर – कर्णधार); स्वयम गांगुर्डे (मुंबई); कार्तिक पठारे (अहमदनगर); शुभम जाधव (कोल्हापूर); अयान पागेदार (पुणे).
प्रशिक्षक: मुथन्ना बी.के. (मुंबई) व्यवस्थापक: अनिकेत मोरे (कोल्हापूर)
मुली : वैष्णवी खंदारे (कोल्हापूर – गोलरक्षक); ऋषिका नवलखा (पुणे – गोलरक्षक); माही चौधरी (पुणे); गौरी कोळपे (सांगली); आकांशा पाल (मुंबई); सिद्धी गवळी (पुणे); संजना खेतावत (पुणे); अर्चा शशिधरन (पुणे); अस्मिता घोटले (सांगली); ज्युथिका बोडखे (नागपूर); सावित्री बोरगल्ली (कोल्हापूर); विलोना रॉड्रिक्स (मुंबई); सायमा तांबोळी (सांगली); सुकन्या डावरे (पुणे); तनुश्री कडू (यवतमाळ); खुशी (मुंबई); सानिका माने (कोल्हापूर – कर्णधार); झेड. लालदिंतलुआंगी, झेड. हमिंगचुंगनुंगा (मुंबई).
प्रशिक्षक : वैशाली सुल (पुणे), व्यवस्थापक : हर्षा इंगळे (यवतमाळ).