Explore

Search
Close this search box.

Search

May 23, 2025 4:12 pm

MPC news

Talegaon: शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श विद्या मंदिरचे नेत्रदीपक यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदिर शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेदांत प्रशांत गादेकर या विद्यार्थ्याने मावळ तालुक्यात द्वितीय क्रमांक तर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 307 वा क्रमांक प्राप्त केला आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व राहुल कुंभार याने मावळ तालुक्यात नववा क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत 438 वा क्रमांक प्राप्त केला आहे. सोहम रावसाहेब नरूटे याने मावळ तालुक्यात दहावा क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत 472 वा क्रमांक संपादित केला आहे.

मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांच्या शुभहस्ते जिल्हा गुणवत्ता यादीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच विद्यालयात संपन्न झाला. यावेळी या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी या परीक्षांचा पुढील आयुष्यात फायदा होत असून यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची चांगली सवय लागते असे सांगितले. अभ्यासाबरोबरच शरीर सदृढ करण्यावरही भर देण्याचे आवाहन केले.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष खामकर यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ढवळे, स्वाती शिंदे, सुजाता डावखरे, राजश्री बनसोडे, बालम शेख, कीर्ती मोहरीर, संभाजी ठाकूर, सारिका थरकुडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर