एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 47 हजारांचा (Chakan)ऐवज चोरून नेला. ही घटना राणुबाई मळा, चाकण येथे बुधवारी (दि. 17) सायंकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी राजू विठ्ठल कणसे (वय 50, रा. राणुबाई मळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Talegaon Dabhade: आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे उज्वल भविष्य – विलास काळोखे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कणसे यांचे घर बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 45 हजार रुपयांचेे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन हजार 100 रुपयांचे 23 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 47 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.