एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तुल बाळणार्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहूरोड जकात नाका (Dehuroad )येथे शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आदित्य रमेश चांदणे (वय 22, रा. अशाेकनगर, ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचमधील पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Hinjawadi : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण देहूरोड जकात नाका येथे पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचमधील पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आदित्य चांदणे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आढळून आले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.