एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा(Hinjawadi) मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी येथे गुरुवारी (दि. 18) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.
बाबू सेतू पवार (वय 44, रा. म्हाळुंगे रोड, हिंजवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सागर बाबू पवार (वय 18) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी काळ्या रंगाच्या क्रेटा कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Talegaon Dabhade: आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे उज्वल भविष्य – विलास काळोखे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडिल हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. ते साखरे पाटील हॉटेल समोर, भंगाराच्या दुकानाच्या थोडे पुढे आले असता भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सागर हे किरकोळ जखमी झाले तर त्यांच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.