याबाबतची माहिती अशी मिळत आहे की, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधक बॅटिंग करीत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षातील प्रत्येकाला मैदानात उतरून जोरदार बॅटिंग करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोकून काढा, असा स्पष्ट आदेश दिला.
आज गुरुपौर्णिमा असून भगवा ध्वज आपल्या सर्वांचा गुरू आहे. हा ध्वज शिवाजी महाराजांचा आहे. त्याचा आपण मान मनापासून राखला पाहिजे, असे आवाहनही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. 2013 ला आपण असेच अधिवेशन घेतले होते आणि 2014 ला निवडून आलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार येणार आहे. हा भाजपचा विचार गावापर्यंत पोहोचविणार आहे. 2019 च्या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा बघितला. 2014 लाही जनता आपल्या पाठीशी होती. दरम्यान, फडणवीस यांनी विरोधकांना ठोकून काढण्याचे आदेश दिल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय मार्गदर्शन करणार, याची उत्सुकता लागली आहे.