गुरुपौर्णिमेच्या व उद्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शुभेच्छा देत असताना या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघ हा महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मिळावा. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात देण्यात यावा, अशी विनंती सर्वांच्या वतीने एकमताने करण्यात आली. अजित पवार यांना दिलेले विनंती पत्र व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या असलेले पत्र त्यांनी वाचून घेऊन एक सकारात्मक प्रतिसाद आम्हास दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील खडकवासला मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी एकत्रित येऊन होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला मिळावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवार यांनी सुद्धा या मागणीला दुजोरा देऊन महायुतीच्या नेत्यांची ज्या वेळेस जागा वाटपा संदर्भात बैठक होईल, त्या बैठकीत या पत्राचा संदर्भ देऊन आपली मागणी मी त्या बैठकीमध्ये मांडेन, असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, दिलीपभाऊ बराटे, दत्तात्रय धनकवडे, विजय आप्पा रेणुसे, शुक्राचार्या वांजळे, विकास दांगट, अक्रूर कुदळे, शैलेश चरवड, प्रवीण शिंदे, सायली वांजळे, पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, सुवर्णा पायगुडे, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, शंकर उर्फ बंडू केमसे, अश्विनी भागवत, सागर भागवत, राजेंद्र पवार, बाळासाहेब कापरे, दिवाकर पोफळे, मयूरेश वांजळे यावेळी(Pune) उपस्थित होते.