एमपीसी न्यूज – बाल्यावस्थेत असताना मुलीचा 15 वर्षांनी मोठा असलेल्या (Rajasthan )मुलासोबत विवाह लावून दिला. मुलगी वीस वर्षांची झाल्यानंतर तिला संबंधित तरुणाच्या घरी जाण्यासाठी दबाव आणला. याप्रकरणी मुलीने गुन्हा नोंद केल्यानंतर मुलीच्या नंबरवर पोलीस असल्याची बतावणी करून तपासासाठी पैशांची मागणी केली जात आहे.
मुलगी अवघी दोन महिन्यांची असताना तिचा पंधरा वर्षांनी मोठ्या मुलासोबत कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन साखरपुडा केला. पुढे मुलगी वीस वर्षांची झाल्यानंतर तिला संबंधित तरुणाच्या घरी नांदण्यासाठी जाण्याबाबत दबाव आणला. हा प्रकार मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याने त्यांनी विरोध केला. त्यानंतर संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या कुटुंबीयांना दमदाटी करण्यात आली.
Talegaon Dabhade : पथारीवाल्यांसाठी रोटरी सिटीचा छत्रछाया उपक्रम
याबाबत मुलीने जोधपूर जिल्ह्यातील ढोरीमन्ना पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा नोंदवला. यानंतर अनोळखी व्यक्तींकडून मुलीला फोन करून तपासासाठी पैशांची मागणी केली जात आहे. ढोरीमन्ना पोलीस ठाण्यातून गिरधारीराम, रंगाराम आणि मारकाराम बोलत असल्याचे फोनवरील व्यक्ती सांगत आहेत. आम्ही आरोपींना पकडण्यासाठी जात आहोत त्यामुळे खर्चासाठी पाच हजार रुपये देण्याची मागणी फोनवरील व्यक्तीकडून केली जात आहे.
ऑनलाइन माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी अनोळखी व्यक्तींकडून मुलीच्या व्हाट्सअपवर क्यूआर कोड देखील पाठवण्यात आला. मात्र याबाबत तरुणीने विरोध केला असता आरोपींनी क्यूआर कोड आणि पैशांची मागणी करणारे मेसेज डिलीट केले. दरम्यान फोनवरील व्यक्तींनी विश्वास पटविण्यासाठी मुलीने दिलेली फिर्याद देखील वाचून दाखवली. याबाबत पीडित मुलगी पुन्हा पोलिसात जाण्याच्या पवित्र्यात आहे.