एमपीसी न्यूज- रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने तळेगाव शहर व (Talegaon Dabhade)स्टेशन भागातील पथारीवर बसून विक्री करणारे भाजी, फळ, चांभार आणि इतर लहान व्यावसायिकांना 30 मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. प्रामुख्याने पथारीवर बसणाऱ्या गोरगरीब विक्रेत्यांना यात प्राधान्य देण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष रो भगवान शिंदे, माजी अध्यक्ष, सह प्रांतपाल रो दीपक फल्ले, प्रकल्प प्रमुख रो प्रदीप मुंगसे, रो राकेश गरुड, रो प्रदीप टेकवडे, रो राकेश ओसवाल, रो प्रशांत ताये, डॉ. रो धनश्री काळे, रो हर्षल पंडित, रो रामनाथ कलावडे हे उपस्थित होते.
Chakan : चाकणमध्ये 47 हजारांची घरफोडी
समाजात काम करत असताना आपणही या समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम रोटरी सिटीने राबवला असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष रो किरण ओसवाल यांनी व्यक्त केले.
आम्हाला भर पावसात या छत्रछाया देऊन तुम्ही आमचे खूप मोठे सहकार्य केले आहे. आम्ही आमची भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही अशी मन मोकळी भावना या विक्रेत्यांनी व्यक्त केली.