Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 6:27 pm

MPC news

Vadivale Dam : वडिवळे धरण 80 टक्के भरले; नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात आणि परिसरात मागील काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. वडिवळे धरण 80 टक्के क्षमतेने भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरेल आणि त्यानंतर नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात(Vadivale Dam) आले आहे.

Pune : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार, हे मी लिहून देतो : देवेंद्र फडणवीस

रविवारी (दि. 21) दुपारी दोन वाजता वडिवळे धरण 80 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ झाल्यास व पाऊस सुरू राहिल्यास परिस्थितीनुसार वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे.त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून(Vadivale Dam) करण्यात आले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर