एमपीसी न्यूज – जम्मू मधील राजौरी (Rajouri Attack) येथे असलेल्या लष्कराच्या छावणीवर सोमवारी (दि. 22) सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे.
राजौरी मधील गुंधा येथील 63 आरआर आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी सोमवारी (Rajouri Attack) सकाळी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये एका जवानाला गोळी लागली. त्यामध्ये तो जखमी झाला. जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pimpri : पिंपरीत हिट अँड रन; महिला गंभीर जखमी
लष्कराच्या छावणीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अधिक सुरक्षा पथके पाठविण्यात आली आहेत. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
22 एप्रिल पासून जम्मू परिसरात 10 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये 12 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर लष्कराने आता सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे 7000 कर्मचारी, आठ ड्रोन, हेलिकॉप्टर आणि सुमारे 40 स्निफर डॉग या मोहिमेत तैनात करण्यात आले आहेत.
डोडा आणि काठुआ जिल्ह्यातील पीर पंजाल रेंजच्या जंगलात ही शोध मोहीम सुरू आहे. या जंगलातील काही ठिकाणे सुरक्षा दलांनी निश्चित केली आहे. जंगलातील 20 चौरस किलोमीटरचा मोठा परिसर आहे. तिथून दहशतवादी सहजपणे डोंगरावर चढून हल्ले करू शकतात. त्यामुळे जवानांना पर्वतांवर अन्नपदार्थ आणि दारुगोळा घेऊन तैनात करण्यात आले आहे.