एमपीसी न्यूज – सोशल मिडियावर ओळख झालेल्या मित्राने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार 20 जुलै 2020 ते 31 मे 2024 या कालावधीत धावडेवस्ती, भोसरी येथे घडला.
मोहन भाऊराव सोळंखे (रा. लोनगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दादर, मुंबई येथे राहणार्या 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
Mumbai : गेटवे ऑफ इंडिया लगत अरबी समुद्रात उडी मारून हिरे व्यापाऱ्याने संपवले जीवन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांची ओळख सोशल मिडियावर झाली. त्यानंतर त्यांचे मोबाइलवर बोलणे सुरू झाले. आरोपी हा 20 जुलै 2020 ते 31 मे 2024 या कालावधीत पिडित तरुणीला सोबत घेऊन धावडेवस्ती, भोसरी येथे राहिला. त्यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध(Bhosari) आले. त्यातून ती तरुणी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिली. वेळोवेळी तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता एक महिन्याने लग्न करू, दोन महिन्याने लग्न करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तुझ्यासोबत राहायचे नाही, असे म्हणत आरोपी मोहन सोळंखे हा मूळगावी म्हणजेच लोनगाव येथे निघून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.