एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पिंपरी, वाकड, मोशी त्यानंतर आता चिंचवडमध्येही वाहनांची तोडफोड झाली आहे.लिंक रोड, चिंचवड येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार जणांनी मिळून सात वाहनांची तोडफोड केली. यामध्ये दुचाकीचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) पहाटे घडली. चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात(Chinchwad) घेतले आहे.
Talegaon Dabhade: लग्नाचे अमिष दाखवून विवाहित व्यक्तीकडून तरुणीवर अत्याचार
पिंपरीमध्ये सलग दोन दिवस वाहनांची तोडफोड झाली. तर वाकड मध्ये तीन ते चार वेळेला वाहनांच्या तोडफोडीच्या घटना उघडकीस आल्या. दरम्यान मोशी येथे देखील वाहनांची तोडफोड झाली. पिंपरी चिंचवड शहरात सातत्याने वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत.परिसरात दहशत पसरविण्यासाठी तसेच लूटमार करण्याच्या हेतूने ही तोडफोड केली जात आहे. काहीजण तोडफोड करताना व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मी इथला भाई आहे, या स्टेटससाठी अल्पवयीन मुले देखील अशा प्रकारचे गुन्हे करीत(Chinchwad) आहेत.