एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील (Kiwale)किवळे, विकासनगर, मामुर्डी, साईनगर भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणकडे केली. याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, युवासेना शहरप्रमुख माऊली जगताप, पिंपरी विधानसभा युवासेनाप्रमुख सागर पुंडे उपस्थित होते.
PCMC : महापालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्थापन निवडणुका
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील किवळे विकासनगर मामुर्डी साईनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात. ज्या ठिकाणी विद्युत रोहित्र कमी दाबाचे असेल त्या ठिकाणी वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. जास्त दाबाचे रोहित्र टाकण्यात यावे. ज्या ठिकाणी अंडरग्राउंड झालेले नाही त्या ठिकाणी विद्युत केबल भूमिगत करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी लाल डीपी ना दुरुस्त असतील ते दुरुस्त करण्यात यावेत.