Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 11:53 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Maval : दुर्ग भ्रमंतीसाठी आलेली मुंबईची तरुणी तुंग किल्ल्यावरून पडली

एमपीसी न्यूज – मुंबई येथून दुर्गभ्रमंतीसाठी आलेली (Maval )तरुणी तुंग किल्ल्यावरील बालेकिल्ला उतरताना पडली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी तिची मदत करत तिला खाली आणले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी घडली.

याबाबत माहिती अशी की, एक तरुणी मुंबई येथून रविवारची सुट्टी असल्याने सहकाऱ्यांसोबत मावळ तालुक्यातील तुंग किल्ल्यावर दुर्ग भ्रमंतीसाठी आली. रविवारी दुपारी दुर्गभ्रमंती करत असताना बालेकिल्ल्यावरून खाली उतरताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. त्यामध्ये तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Pimpri : पिंपरी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अटकेत

आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी काही संस्थांनी किल्ल्यावर ठिकठिकाणी फलक लावले आहेत. तरुणीच्या सहकाऱ्यांनी त्या फलकावरील क्रमांकावर मदत मागितली. त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी मदतीचा हात देत तरुणीला स्ट्रेचरवरून खाली आणले.

किल्ल्याच्या पायथ्याशी आणल्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तरुणीला रुग्णालयात पाठविण्यात आले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर