एमपीसी न्यूज – जुलै महिन्यात सरासरी मध्ये मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या वेल्हे, मुळशी, मावळ या तालुक्यांमध्ये मावळ तालुक्यात 127 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या दौंड तालुक्यात देखील 102 टक्के पाऊस पडला आहे.
पुणे जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर वेल्हे, दुसऱ्या क्रमांकावर मुळशी आणि तिसऱ्या क्रमांकावर मावळ तालुका आहे. वेल्हे तालुक्यात सरासरी 988.8 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यावर्षी 882.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 89.3 टक्के एवढे आहे. मुळशी तालुक्यात सरासरी 645.5 मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी 508.2 मिलिमीटर म्हणजेच 78.7 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी दौंड आणि बारामती तालुक्यात पाऊस पडतो. यावर्षी दौंड तालुक्यात 66.3 तर बारामती तालुक्यात 34 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
Bhosari : ‘आमदार साहेब, दहा वर्षातील एकच ठोस काम दाखवा’
पुणे जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी 327.2 मिलिमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्याची जिल्ह्याची एकूण सरासरी काढली असता आतापर्यंत 224.9 म्हणजेच 68 टक्के पाऊस पडला आहे.
मावळ तालुक्यात जुलै महिन्यात सरासरी 468.2 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र मागील 22 दिवसांमध्ये तालुक्यात 594.4 मिलिमीटर पाऊस पडला आहे. टक्केवारी मध्ये हे प्रमाण 127 टक्के एवढे आहे. 14 जुलै रोजी तालुक्यात सर्वाधिक 107 मिलिमीटर पाऊस पडला.
मावळ तालुक्यातील 22 जुलै पर्यंतचा पाऊस – मिलिमीटर (टक्केवारी)
- तळेगाव – 185.1 मिलिमीटर (39.5 टक्के)
- वडगाव – 264.1 मिलिमीटर (56.4 टक्के)
- काले – 488.4 मिलिमीटर (104.3 टक्के)
- कार्ला – 1269.5 मिलिमीटर (271.1 टक्के)
- खडकाळा – 553 मिलिमीटर (118.1 टक्के)
- लोणावळा – 1020.3 मिलिमीटर (217.9 टक्के)
- शिवणे – 327 मिलिमीटर (69.9 टक्के)