Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 12:30 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Maval: मावळातील दोन चिमुकल्यांनी रोवला मावळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, अवनी व स्वरा यांचा सुपरस्टार छोटे उस्तादच्या अंतिम 12 मध्ये समावेश

एमपीसी न्यूज – मावळात केवळ हिरवळच नाही तर सुरेल स्वरांचा (Maval) गोडवा देखील आहे, हे दाखवून दिले आहे मावळातील अवनी परांजपे व स्वरा किंबहुने या दोन चिमुकल्यांनी. या दोघींच्या आवाजाची भुरळ आता संपूर्ण महाराष्ट्राला पडली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सादर होणाऱ्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 3 या संगीत स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील या दोन कलाकारांची निवड झालेली आहे.  त्यामुळे संपूर्ण मावळातून दोन्ही कलाकारांचे कौतुक केले जात आहे.

अवनी परांजपे व स्वरा किंबहुने यांच्या संगिताच्या प्रवासाला सुरुवात कलापिनी कलामंडळामधून सुरुवात केली. कालापिनी च्या बालनाट्य व श्लोक स्पर्धेत गाणाऱ्या मुलींच्या आवाजाने संपूर्ण राज्यातील रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. यातील अवनी ही केवळ 13 वर्षांची असून सध्या  पुण्यातील भारती विद्या भवन शाळेत 9 वी मध्ये शिक्षण घेत आहे.

 

कलापिनी कला मंडळाचे संस्थापक  डॉ. शंकरराव परांजपे  हे अवनीचे पणजोबा आहेत. त्यामुळे घरातूनच अवनीला कलेची तर आज्जी अंजली कऱ्हाडकर यांच्याकडून संगिताची आवड निर्माण झाली. कलापिनीमधून तिने तिच्या कलागुणांमध्ये प्राविण्य मिळवण्यास सुरुवात केली. बालनाट्य, कथ्थक व गायन अशा सर्व क्षेत्रात तिने आपले पाऊल ठेवले.

गुरु अंजली कऱ्हाडकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. तिला गायनात किर्तन या गायन शैलीमध्ये प्राविण्य मिळवले.  घरातून गायनाला सुरुवात केलेल्या अवनीने अवघ्या 13 व्या वर्षी  गुर-शिष्यांना  नेदरलँड महाराष्ट्र मंडळ इथे कीर्तन – गायन सादर करायची संधी मिळाली.

त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर सादर होणाऱ्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 3 या संगीत स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून ती सध्या अंतिम 12 स्पर्धकांमध्ये पोहचली आहे. आषाढी एकादशीनिमित्त अवनीने सादर केलेल्या अभंगाची भुरळ निरीक्षक व रसिकांना मोहिनी घातली,.  तिच्या या यशामध्ये अवनीचे बाबा अशुतोष परांजपे हे अवनीला हार्मोनियमची साथ देतात तसेच मुंबईमध्ये सध्या तेच अवनीला प्रोत्साहन देत आहेत.

अवनीसह मावळाशी नाते असलेल्या स्वरा अजित किंबहुने हिचा देखील सुपरस्टार छोटे उस्तादच्या अंतिम 12 मध्ये समावेश  झाला आहे. स्वरा ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे. मात्र तिचे आजोळ हे मावळातील कामशेत. तिचे बालपण हे मावळातील कामशेतमध्ये गेले. सध्या ती पिंपरी-चिंचवड येथील रहाटणी येथे राहते. स्वरा ही तिचे प्रथम गुरु  तिचे आई आणि बाबा, मोनिका काकडे – किंबहुने आणि अजित मुकुंद किंबहुने यांना मानते. गाण्याची आवड लक्षात घेता पुढे तिने पुढील शिक्षण विदुषी अपूर्वा गोखले (ग्वाल्हेर घराणा) यांच्याकडून घेत असून ती त्यांच्याकडे मागील 4 वर्षापासून संगीत साधना करत आहे.

RSS News : आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारीही सहभागी होणार; सहा दशकांपूर्वीचे निर्बंध हटवले 

तिच्या या यशाची पायरी ठरली  ती स्टार प्रवाह या मराठी वाहिनी वर “छोटे उस्ताद” या सांगितीक कार्यक्रमांमध्ये . सध्या तिच्या नाजूक व सुमधूर आवाजाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. आई स्वतः शास्त्रीय संगीत गायिका असल्यामुळे तसे पाहायला गेले तर गर्भसंस्कारच झालेले आहे.तिला आई-वडिलांसोबतच आजोबांपासून सुद्धा सांगितीक वारसा लाभलेला आहे … तिचे आजोबा मुकुंद किंबहुने….. संगीताचे उत्तम दर्दी व जाणकार आहेत…तिच्यावर. वयाच्या सहाव्या वर्षी तिने पहिल्यांदाच  ऑनलाइन स्पर्धेत खुल्या गटात भाग घेतला तेव्हा तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.. तेव्हापासून तिचा सांगीतिक प्रवास सुरू झाला.

आई आणि बाबांच्या सानिध्यात हळूहळू एकेक राग गळ्यावर चढायला लागला आणि अनेक गाणीही गळ्यावर चढू लागली आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला.वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी स्वराला तराना गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच अनेक शास्त्रीय संगीताच्या स्पर्धांमध्ये तिने बरीच बक्षीस मिळवलेली आहेत. बऱ्याचदा स्पर्धांमध्ये तिच्या बाबांच्या रचना ती सादर करते.  तसेच सुगम संगीताच्या स्पर्धांमध्ये ही तिने बक्षीसे मिळवलेली आहेत. तिला सर्व प्रकारची गाणी गायला आवडतात.

सध्या ती  दहा वर्षांची आहे आणि आता एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल रहाटणी या शाळेत  पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत आहेत, याविषयी बोलताना तिची आई व सर्व किंबहुने परिवार हे तिचे भरभरून कौतुक करत तिच्या बद्द्लचा अभिमान व्यक्त करतात.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर