Explore

Search
Close this search box.

Search

February 17, 2025 11:47 pm

MPC news

Mumbai : गेटवे ऑफ इंडिया लगत अरबी समुद्रात उडी मारून हिरे व्यापाऱ्याने संपवले जीवन

एमपीसी न्यूज – व्यवसायात नुकसान झाल्याच्या कारणावरून मुंबईतील एका हिरे व्यापाऱ्याने गेटवे ऑफ इंडिया लगत अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 22) उघडकीस(Mumbai) आली.

संजय शहा (वय 65) असे आत्महत्या केलेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, संजय शहा यांना मागील काही महिन्यांपासून व्यवसायात तोटा झाला. त्यामुळे ते तणावात होते. या तणावातून त्यांनी रविवारी गेट वे ऑफ इंडिया जवळील अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.मागील काही दिवसांपूर्वी वरळी-बांद्रा सी लिंकवरून भावेश सेठ या व्यावसायिकाने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. समुद्रात उडी मारण्यापूर्वी सेठ यांनी त्यांच्या मुलाला फोन करून कल्पना दिली होती. तसेच त्यांच्या गाडीत सुसाईडनोट देखील आढळून आली(Mumbai) होती.

Pimpri : पिंपरीत हिट अँड रन; महिला गंभीर जखमी 

त्यापूर्वी ममता कदम (वय 23, रा. अंधेरी) या तरुणीने मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. 15 जुलै रोजी ममता घरातून ऑफिसला जाते असे सांगून बाहेर पडली. त्यानंतर तिने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. तिची बॅग समुद्राच्या बाजूला आढळली. त्यामध्ये असलेल्या कागदपत्रांवरून तिची ओळख पटविण्यात आली. तिने वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले जाते.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर