एमपीसी न्यूज – ‘एक झाड आईसाठी’ या संकल्पनेतून आज संजीवन वन उद्यान या ठिकाणी आमदार भीमराव तापकीर आणि वनअधिकारी प्रदीप संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात(Pune) आला.
फणस, चिंच, कडुलिंब, जांभूळ, वड, पिंपळ अशा प्रकारची झाडे लावण्यात आली. भाजपा प्रभाग 32 मधील पदाधिकारी, सभासद तसेच विविध सोसायटी मधील सभासद वृक्ष आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “151” झाडे लावण्यात आली. आमदार भिमराव तापकीर आणि प्रदीप संकपाळ यांनी मार्गदर्शन केले. वृक्ष लागवडीनंतर वन भोजनाचा आनंद घेण्यात(Pune) आला.
PCMC : डेंग्यूमुक्त पिंपरी-चिंचवड अभियानात सहभागी व्हा; जनसंवाद सभेतून आवाहन
या कार्यक्रमाचे आयोजन रोहिणी वासुदेव भोसले आणि वासुदेव शिवाजी भोसले (भाजपा अध्यक्ष वारजे माळवाडी प्रभाग 32) व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले होते. प्रिया लेले, डॉक्टर मोनिका मोहरीर, वैदही देशपांडे, चारुशीला सांगळे, प्राजक्त पानसे, विमल मगर, सुजाता कुलकर्णी, गजानन देशपांडे, शिरीष खलीकर, कमल कक्कर, नितीन मैय्या, दत्तात्रय मुजुमदार, रमेश बारवकर यावेळी उपस्थित होते.