Explore

Search
Close this search box.

Search

March 27, 2025 2:35 am

MPC news

RSS News : आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारीही सहभागी होणार; सहा दशकांपूर्वीचे निर्बंध हटवले 

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात (RSS News)सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी 58 वर्षांपूर्वी निर्बंध झाले गेले. हे निर्बंध हटविण्यात आले असून आता आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांनाही सहभागी होता येणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. याचा विरोध करत असताना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले की, फेब्रुवारी 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर निर्बंध लावले होते. त्यानंतर चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर हे निर्बंध हटवले गेले.

Rajouri Attack : जम्मूच्या राजौरी मध्ये लष्कराच्या छावणीवर हल्ला 

सन 1966 मध्ये आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यावर निर्बंध घातले होते. हा निर्णय योग्य होता. हे निर्बंध अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान कार्यकाळातही लागू होते. नऊ जुलै 2024 मध्ये हे निर्बंध हटविण्यात आले, असे म्हणत काँग्रेसकडून या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे.

58 वर्षांपूर्वी जारी केलेला घटनाबाह्य आदेश मोदी सरकारकडून रद्द केला आहे, असे म्हणत भाजपा नेते अमित मालवीय यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर