एमपीसी न्यूज – अविवाहित असल्याचे खोटे सांगून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जुलै 2023 ते 19 जून 2024 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी एकावर ॲट्रासिटीसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश लक्ष्मण आहिरे (रा. ब्राम्हणाव, ता. सटाणा, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तळेगाव दाभाडे येथे राहणार्या 23 वर्षीय तरुणीने सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
Vadivale Dam : वडिवळे धरणातून विसर्गाला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याला फिर्यादी तरुणीची जात माहिती होती. तसेच तो विवाहित असूनही अविवाहित असल्याचे फिर्यादी तरुणीला खोटे सांगितले. त्यानंतर तिला आळंदी, पुणे येथे नेऊन तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याशी शाररिक संबंधही ठेवले. मात्र त्याचे लग्न झाले असल्याचे समजताच तिने लैंगिक अत्याचार व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.