एमपीसी न्यूज – आईचा मृतदेह फेकताना रडत असल्याने दोन्ही मुलांनाही इंद्रायणी नदीत फेकून (Talegaon)दिल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. वराळे येथील पुलावरून तिघांनाही ढकलून देण्यात आले. या तिघांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह मावळ तालुक्यातील वराळे येथे आणण्यात आला. दरम्यान तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्याने आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राने दोन्ही मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिले. तसेच महिलेचा मृतदेह देखील इंद्रायणी नदीत फेकला.
Pune : संजीवन वन उद्यानात वृक्ष लागवड
महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघांचा मृतदेह शोधण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा या संस्थांना पाचारण केले.
संस्थेचे निलेश गराडे, गणेश निसाळ, सुरज शिंदे, संकेत दहीतुले, अविनाश कार्ले, वैभव वाघ, भास्कर माळी, विनय सावंत, सर्जेस पाटील, शुभम काकडे, महेश मसने, आशोक उंब्रे, योगेश दळवी, राजू कडू, सुनिल गायकवाड यांचे पथक बेपत्ता तिघांचा शोध घेत आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे शोध कार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत.