एमपीसी न्यूज – सार्वजनिक शौचालयात काम करणाऱ्या व्यक्तीने आत मध्ये जाणाऱ्या (Wakad)व्यक्तीला पाच रुपये मागितले. त्या कारणावरून कामगारास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भुजबळ चौक, वाकड येथील सार्वजनिक शौचालयात घडली.
पारसकुमार श्रीगोपीराम शर्मा (वय 39, रा. भुजबळ चौक, वाकड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद शाकीब (वय 25, रा. भुजबळ चौक, वाकड) याच्याबरोबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC : डेंग्यूमुक्त पिंपरी-चिंचवड अभियानात सहभागी व्हा; जनसंवाद सभेतून आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा हे भुजबळ चौक वाकड येथील सार्वजनिक शौचालयात काम करतात. शौचालयात आलेल्या मोहम्मद शाकीब याच्याकडे शर्मा यांनी पाच रुपये मागितले. त्यावरून मी पैसे देणार नाही असे म्हणत आरोपीने शर्मा यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने हातावर मारले. त्यानंतर तुझ्याकडे आता बघतोच असे बोलून दोन स्क्रू ड्रायव्हरने शर्मा यांच्या डोक्यात मारून त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.