एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका जिम ट्रेनरला मारहाण(Akurdi) केली. ही घटना 16 जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजता दुर्गा कॅफे चौक, आकुर्डी येथे घडली.
इम्तियाज बादशाह शेख (वय 30, रा. आकुर्डी. मूळ रा. सोलापूर) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशराज शेलार आणि त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख जिम ट्रेनर आहेत. ते 16 जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजता जिममध्ये जात होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख यांना अडवले. लोखंडी रॉड व दांडक्यांनी डोक्यात, पाठीत आणि हातापायावर मारून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.