Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 11:42 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Budget 2024 : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता कोणाला किती टक्के कर लागणार? जाणून घ्या…..

एमपीसी न्यूज –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा अर्थसंकल्प  सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या आयकर कराविषयी घोषणा केली असून जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला(Budget 2024) नाही.

मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांचे  17500 रुपये वाचणार असून नव्या करप्रणालीत झालेले बदल नोकरदारांसाठी फायदेशीर ठरणार, असे तुर्तास तरी दिसत आहे. याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार असून फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशात सध्या जुनी आणि नवी अशा दोन करप्रणाली आहेत.

नव्या करप्रणालीनुसार कोणाला किती कर भरावा लागणार

3 लाख रुपये- कोणताही कर नाही
3 लाख ते 7 लाख रुपये- 5 टक्के
7 लाख ते 10 लाख रुपये- 10 टक्के
10 लाख ते 12 लाख- 15 टक्के
12 लाख ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न- 30 टक्के

जुन्या करप्रणालीनुसार कोणाला किती कर भरावा लागणार-

2.50 लाख उत्पन्नापर्यंत- कोणताही कर नाही
2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर- 5 टक्के
5 ते 10 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर- 20 टक्के
10 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर सरसकट- 30 टक्के

जुन्या करप्रणालीतील 2.50 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर जो कर आकारला जातो, ती रक्कम कर परतव्याच्या तरतुदीनुसार परत मिळतो. त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार बघायला गेल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.

नव्या करप्रणालीनुसार 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5 टक्के कर लागू होतो. नव्या करप्रणातील स्टँटर्ड डिडक्शन वगळता इतर कोणत्याही पद्धतीने आयकरात सूट मिळत नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारला सूट वाढवणे अपेक्षित होते, परंतु सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत त्यामुळे करदाते आता नव्या करप्रणालीचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर