एमपीसी न्यूज – चाकण येथे अवघ्या एक तासात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातून तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हे घरफोडी सोमवारी (दि.22) दुपारी दिड ते अडीच या कालावधीत घडला(Chakan) आहे.
याप्रकरणी अमर रमेश कदम (वय 30 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. चोराने अवघ्या एक तासात घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील बेड मधून 81.78 ग्राम वजनाचे एकूण तीन लाख 11 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व विवो कंपनीचा(Chakan) मोबाईल चोरून नेला आहे. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत(chakan) आहेत.