एमपीसी न्यूज – जाधववाडी, चिखली येथे लाकडाच्या वखारीला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सहा वाजता जाधववाडी, चिखली येथील लाकडाच्या वखारीला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार तळवडे आणि चिखली उपविभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली.
Union Budget 2024-25 : आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
सध्या वखारी मध्ये कुलींग करण्याचे काम सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.