एमपीसी न्यूज – विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर (Chinchwad)यांची पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. सध्या ते गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी कार्यरत होते.
राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी आदेश दिले आहेत. त्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई) सुहास वारके यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे बदली झाली.
Pimple Nilakh : जुन्या भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार
विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे कार्यरत असलेल्या अश्र्वती दोरजे यांची सुहास वा यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे बदली झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली होती. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदावर वर्णी लागण्यासाठी अनेक नावांची शक्यता वर्तवली जात होती.
मंगळवारी (दि. 23) गृह विभागाने केलेल्या बदल्यांमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त पदी विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे कार्यरत असलेले शशिकांत महावरकर यांची बदली केली आहे.