Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 7:17 am

MPC news

Hockey : हॉकी महाराष्ट्राची राजस्थानवर मात

एमपीसी न्यूज – हॉकी महाराष्ट्राने सुरत येथे सुरू असलेल्या दुसर्‍या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष आणि महिला वेस्ट झोन 2024 स्पर्धेत पहिल्या दिवशी हॉकी राजस्थानविरुद्धचे दोन्ही सामने(Hockey) जिंकले.

पुरुष  ‘अ’  गटाच्या सलामीच्या लढतीत, महाराष्ट्राने राजस्थानचे आव्हान 3-1 असे मोडून काढले. महिला संघांने राजस्थानला 4-2 असे पराभूत केले.दोन गोल करणारा सामनावीर ज्ञानेशकुमार विजकापे महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला. राजस्थानकडून अमित सिंगने गोल केला. मात्र, शेवटच्या मिनिटाला सचिन ठाकूरच्या गोलच्या जोरावर महाराष्ट्राने 3-1 अशी आघाडी घेतली.तत्पूर्वी, महिला गटात अन्वी रावतने पेनल्टी स्ट्रोक आणि पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर दोन गोल केले.यशस्वी कुबडेने तितकेच गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. राजस्थानकडून दोन्ही गोल लमोरिया सालिनी(Hockey) हिने केले.

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पावरून उद्योग नगरीत ‘कहीं ख़ुशी कहीं गम’

निकाल –
पुरुष
अ गट: हॉकी महाराष्ट्र:
 3(ज्ञानेशकुमार विजकापे 7’, 38’ – पीसी; सचिन ठाकूर 60’ पीसी) विजयी वि. हॉकी राजस्थान: 1(अमित सिंग 13’ – पीसी). हाफटाईम: 1-1.

महिला (राऊंड रॉबिन)
हॉकी महाराष्ट्र: 4 
(अन्वी रावत 10’ – पीएस, 53- पीसी; यशस्वी कुबडे 25’, 44’) विजयी वि. हॉकी राजस्थान: 2(लमोरिया सालिनी 19’, 25’). हाफटाईम: 2-2.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर