एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील मुक्त पत्रकार, साहित्यिक, क्रीडा समीक्षक आणि एमपीसी न्यूजचे स्तंभ लेखक विवेक कुलकर्णी यांचे “शापित गंधर्व, कथा आणि व्यथा “हे ई-पुस्तक नुकतेच गुगल प्ले बुक वर प्रकाशित झाले आहे.
एमपीसी न्यूज आणि बीड येथील दिव्य लोकप्रभा या दैनिकामध्ये मागच्या वर्षी सुरु झालेले हे सदर सतत 52 आठवडे सुरु होते.
क्रिकेट, कला, राजकीय क्षेत्रातील असामान्य पण दुर्दैवाने शापित अशा 52 गंधर्वांवर ही लेखमाला प्रकाशित झालेली आहे. यात प्रमोद महाजन, राजीव गांधी, मधुबाला, पद्माकर शिवलकर आदी व्यक्तीचित्रे यात समाविष्ट आहे.
Union Budget 2024-25 : आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
साधी सोपी पण काळजाला भिडणारी भाषा आणि त्यांचे संपूर्ण चरित्र लेखकाने सुंदर रित्या मांडत वाचकांच्या काळजाला हात घालण्यात यश मिळवले आहे.
विवेक कुलकर्णी यांनी हे पुस्तक प्रकाशित करताना गुगल प्ले बुकवर वाचकांना मोफत वाचनासाठी ठेवले आहे. 182 पानाच्या या पुस्तकाला जेष्ठ साहित्यिका दीपा देशमुख यांची प्रस्तावना लाभली आहे.
पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुप्रसिद्ध गजलकार सदानंद बेंद्रे यांनी पाठराखण केली आहे, दुसरे साहित्यिक प्रमोद खराडे यांनीही मोजक्या पण छान शब्दात या पुस्तकावर आपले मनोगत व्यक्त केले आहे.
ठाणे येथील ग्रंथयुग प्रकाशन यांनी हे पुस्तकाची देखणी मांडणी केली आहे. एकूणच हे पुस्तक नक्कीच वाचनीय झाले आहे, वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडावे असेच आहे.