Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 8:35 am

MPC news

Pimpri : खंडणीविरोधी पथकाचे दुसऱ्यांदा स्थलांतर 

नाशिक फाटा, वाकड मार्गे आता पिंपरीत कार्यालय

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक नाशिक फाटा येथून वाकडमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. तब्बल तीन वर्षांनंतर आता पथकाने मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे कामकाज सुरू केले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पथकाला जागा मिळाल्याने तक्रारदारांना सोयीचे ठरणार आहे.

अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर, विशाल हिरे, पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार उपस्थित होते.

Pavana Dam Update: पवना धरण 50 टक्के भरले! 

पिंपरी- चिंचवड शहरासाठी सन 2018 मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. त्यावेळी खंडणी आणि दरोडा विभागाचे एकत्रित कामकाज चालत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्याकडे या विभागाची जबाबदारी होती. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खंडणी आणि दरोडा प्रतिबंधक विभाग वेगळे केले.

तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे यांच्याकडे दरोडा आणि श्रीराम पौळ यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची धुरा देण्यात आली. पथके वेगळे केले तरीही कित्येक दिवस दोन्ही पथकांचे नाशिक फाटा येथील एकाच इमारतीतून कामकाज सुरू होते. त्यामुळे दोन्ही पथकांना काम करताना अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून सन 2021 मध्ये खंडणी विरोधी पथक वाकड येथे स्थलांतरित करण्यात आले.

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खाली वाकड चौकीतील दोन खोल्यांमध्ये पथकांचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, खंडणी विरोधी पथकाला जागा कमी पडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तसेच, परिमंडळ तीनमधून येणाऱ्या तक्रारदारांना खंडणी विरोधी पथकाचे अंतर जास्त पडत होते. या सर्व बाबींचा विचार करून मध्यवर्ती असलेल्या पिंपरी येथील मासुळकर कॉलनीमध्ये पथकाला जागा उपलब्ध करून देण्यात आली.

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर