एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर (Talegaon Dabhade) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांच्याकडे दिला आहे.
अशोक दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अध्यक्षपदाची धुरा 2023 मध्ये घेतली होती. मध्यंतरी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तळेगाव शहरांमधून महायुतीचा उमेदवाराला चांगल्या प्रकारे मताधिक्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मिळवून दिलं होते.
Talegaon : तिहेरी हत्याकांड प्रकरण; इंद्रायणी नदीत तिघांचा शोध सुरू
दाभाडे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये कार सेवकांचा सन्मान,अयोध्येमध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी तळेगाव शहरातील पक्षाच्या सर्व मोर्चा, आघाड्याच्या नियुक्त करणे, तळेगाव मध्ये मतदार वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच तळेगावातील अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आदी उपक्रम सर्व सहकाऱ्यांच्या समावेत पक्ष वाढीसाठी यशस्वीरित्या पार पाडले. या सर्व गोष्टी होत असताना त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे स्वखुशीने जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याबाबत चर्चेला उधाण आले आहे.