एमपीसी न्यूज -आजचे पंचांग आजचा दिवस – मंगळवार. Today’s Horoscope 23 July 2024 आजचे राशीभविष्य
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा २०.१८ पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी – मकर ९.२० पर्यंत नंतर कुंभ.
—————————–
मेष- ( शुभ रंग- डाळिंबी)
नोकरी धंद्यातील अनुकूलता वाढेल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाला मान राहील. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णय योग्य ठरतील. काही दुरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.
वृषभ (शुभ रंग- मरून)
नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या बातम्या येतील. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. कार्यक्षेत्रात आज तुम्ही स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. आज विरोधक तुमच्यापुढे माघार घेतील.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत. अडचणींच्या प्रसंगी अनुभवींचे सल्ले अवश्य घ्यावेत. आज अहंकारास थारा देऊ नका सुसंवाद कामी येईल.
Talegaon : तिहेरी हत्याकांड प्रकरण; इंद्रायणी नदीत तिघांचा शोध सुरू
कर्क ( शुभ रंग- मोतिया)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरी साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे जाऊ नका. कायद्याची चौकट मोडू नका.
सिंह ( शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका.
कन्या (शुभ रंग- चंदेरी)
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. जेष्ठ मंडळींना आरोग्य विषयक समस्या भेडसावतील.
तूळ (शुभ रंग- भगवा)
आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
प्रॉपर्टी शेतीवाडी संबंधित खरेदी विक्रीच्या व्यवहारात अपेक्षित नफा होईल. आज मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेम प्रकरणात नसती आफत होईल. सावध रहा.
धनु (शुभ रंग- सोनेरी)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादाला कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज काम कमी व दगदग जास्त.
मकर (शुभ रंग- मोरपिशी)
धंद्यातील येणी वसूल होतील. आज विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल. काही जणांना दंत वैद्याची भेट घ्यावी लागणार आहे
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात राहाल. व्यक्तिमत्व विकासावर लक्ष द्याल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. आज तुम्हाला इतरांचे विचार पटणार नाहीत.
मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तुमचे कार्यक्षेत्र विस्तरेल. कार्यालयीन कामासाठी आज प्रवास घडतील. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. दिवस खर्चाचा आहे मनसोक्त खर्च करा.
शुभम भवतु.
जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424