Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 9:41 am

MPC news

Union Budget 2024-25 : आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प

मपीसी न्यूज – मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता सादर होणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (Union Budget 2024-25) साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठरणार आहेत.

सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या असून या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.

Today’s Horoscope 23 July 2024 : आजचे राशीभविष्य

दरम्यान या अर्थसंकल्पातून (Union Budget 2024-25) ज्येष्ठ नागरिकांनाही खूप अपेक्षा आहेत. रेल्वे तिकीटात पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना सूट दिली जायची, जी मधल्या काळात बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही सूट पुन्हा मिळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

आज या घोषणा होण्याची शक्यता!

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो.
  • कृषी क्षेत्राच्या विकास दराला गती देण्यासाठी उपाययोजना जाहीर करण्याची शक्यता
  • ग्रामीण भागांसाठी पंतप्रधान आवास योजनांसंदर्भात घोषणांची शक्यता
  • मनरेगाच्या कामकाजाचे दिवस वाढण्याची शक्यता असून शेतीशी संबंधित कामांचाही समावेश करण्याबाबत घोषणा केल्या जाऊ शकतात.
  • महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाऊ शकतं.
  • नव्या कर प्रणालीमध्ये आयकर सूट स्लॅबची मर्यादा 5 लाख असू शकते.
  • गृहकर्ज घेतल्यावरही नव्या सवलतीची शक्यता.
  • पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वाढवला जाऊ शकतो.
  • एमएसएमईवर विशेष लक्ष दिलं जाऊ शकतं.
  • OPS बाबत परिस्थिती स्पष्ट होऊ शकते.
  • ईव्ही म्हणजेच, इलेक्ट्रिक वाहनांबाबत प्रोत्साहनं दिलं जाऊ शकतं.
  • ग्रीन एनर्जीला चालना मिळू शकते.
  • पीएलआय योजनेचा विस्तार इतर भागांत करता येईल.
  • श्रम सुधारणांबाबत कामगार संहितेबाबत स्पष्टता देता येईल.

निर्मला सीतारामन यांचे आजचे वेळापत्रक

  • सकाळी 8.30वा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे, नॉर्थ ब्लॉकसाठी रवाना होतील.
  • सकाळी 9.00वा – बजेट तयार करणा-या टीमसोबत नॉर्थ ब्लॉक येथे फोटो सेशन
  • सकाळी 9:10वा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या टीमसह राष्ट्रपती भवनात पोहोचणार
  • सकाळी 9.45वा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेकडे रवाना
  • सकाळी 10.00वा – संसदेत प्रवेश करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री यांचे फोटोशूट
  • सकाळी 10.15वा – संसदेत मंत्रिमंडळाची बैठक
  • सकाळी 11.00वा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार
  • दुपारी 3.30वा – अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद
  • सायं. 7:30वा – दूरदर्शनवर मुलाखत

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर