Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 8:35 am

MPC news

Chakan : बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भोसे(Chakan) येथे करण्यात आली. 

वामन सिताराम कोळेकर (वय 45), भाऊसाहेब रामदास गायकवाड (वय 23, दोघे रा. कोयाळी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद निकाळजे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ; भक्ती सोपान पूल पाण्याखाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे(Chakan) गाडी (एम एच 14/जेएल 1197) मध्ये दोन बैलांची वाहतूक केली. त्यांनी वाहनामध्ये जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था केली नाही. पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर