एमपीसी न्यूज – दुचाकी स्लीप होऊन अपघात (Chakan)झाला. या अपघातात दुचाकी वरील तरुणाचा मृत्यू झाला आणि सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना 16 जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास चाकण पुणे रस्त्यावर बर्गेवस्ती फाटा येथे घडली.
भिवराव दशरथ यमगर (वय 26, रा. दगडवाडी, ता. परळी, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनंता श्रीराम यमगर (वय 26, रा. चाकण. मूळ रा. दगडवाडी, ता. परळी, जि. बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
Sangavi : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनंता आणि त्यांचा मित्र भिवराव दुचाकीवरून चाकण येथून पुण्याच्या दिशेने जात होते. कुरळी गावच्या हद्दीत बर्गे वस्ती फाटा येथे आल्यानंतर दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. यामध्ये भिवराव याचा मृत्यू झाला तर अनंता हे गंभीर जखमी झाले. आहेत महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.