Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 6:53 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Hockey : अपराजित महाराष्ट्राच्या मुली उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज: राजनांदगाव (छत्तीसगड) आणि सुरत (गुजरात) येथे सुरू असलेल्या दुसर्‍या हॉकी इंडिया ज्युनियर महिला पश्चिम विभागीय स्पर्धेत हॉकी महाराष्ट्र हा उपांत्य फेरी गाठणारा पहिला ज्युनियर महिला संघ (Hockey) ठरला.

राजनांदगाव येथे बुधवारी महाराष्ट्राने दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव हॉकी टीमचा 13-0 असा धुव्वा उडवला. खुशी हिचे हॅट्ट्रिकसह 7 गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. तनुश्री कडू (3 गोल), सानिका माने (2) आणि संजना खेतवत (1 गोल) यांची तिला चांगली साथ लाभली. विक्रमी सलग तीन विजयांसह हॉकी महाराष्ट्राने (9 गुण) अंंतिम चार संघांमध्ये दिमाखात स्थान((Hockey) पटकाविले.

Maval :मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने भात शेती पाण्यात

त्यानंतर, महाराष्ट्र ज्युनियर पुरुष संघाला हॉकी मध्य प्रदेशविरुद्ध 4-7 असा पराभव पाहावा लागला. मध्यंतराला 1-4 अशा पिछाडीनंतर अर्जुन हरगुडेचे 2 गोल ही महाराष्ट्रासाठी थोडी जमेची बाजू ठरली.महाराष्ट्र संघाचा 3 सामन्यांमधला हा पहिला पराभव आहे. या पराभवानंतर ते राऊंड-रॉबिन लीगमध्ये 6 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहेत.

सुरत येथे सब ज्युनियर संघांची कामगिरी संमिश्र झाली. मुलांच्या अ गटात हॉकी महाराष्ट्र हा मध्य प्रदेशकडून 0-6 असा पराभूत झाला. त्यांचा दोन  सामन्यांतील हा पहिलाच पराभव आहे. एका विजयासह महाराष्ट्राच्या खात्यात 3 गुण आहेत.महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तरार्धात दमदार पुनरागमनासह गोवन्स हॉकीविरुद्ध 3-1 असा विजय मिळवला. मध्यंतराला महाराष्ट्र संघ 0-1 असा पिछाडीवर होता. दुसर्‍या सत्रात अनुष्का भरत केंजळे, जान्हवी चव्हाण आणि शझेल कौटिन्हो यांनी पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे पिछाडी भरून काढण्यात यश आले.दोन सामन्यांत दोन्ही विजयांसह हॉकी महाराष्ट्र 6 गुणांसह गटात तिसर्‍या क्रमांकावर आहे. छत्तीसगड हॉकी आणि मध्य प्रदेश संघ त्यांच्या पुढे आहेत.

निकाल
सब-ज्युनियर
पुरुष
अ गट: हॉकी महाराष्ट्र
0 पराभूत वि. हॉकी मध्य प्रदेश 6(मोरया ऋषी 16’, 18’ 22’; दीपक सिंग 34’- पीसी; आशीर आदिल खान 42’, 43’). हाफटाईम: 3-0

महिला
राऊंड रॉबिन: हॉकी महाराष्ट्र: 3 (अनुष्का केंजळे 35’- पीसी; जान्हवी चव्हाण 49’-पीसी; शझेल कौटिन्हो 50-पीसी’) विजयी वि. गोवन्स हॉकी: 1 (चंदन शेजवाडकर 11’). हाफटाईम: 0-1

ज्युनियर
पुरुष
अ गट: हॉकी महाराष्ट्र: 4(अर्जुन हरगुडे 28’, 54’; कार्तिक पटारे 31’; संतोष बिराजदार 37’ – पीसी) पराभूत वि. हॉकी मध्य प्रदेश: 7(अलमाझ खान 8’ – पीएस, सोहिल अली 13’- पीसी) रितेंद्र प्रताप सिंग 19’, 46’ – पीसी; विवेका पाल 21; मोहम्मद अनस 35’; हाफटाईम: 1-4

महिला
ब गट: हॉकी महाराष्ट्र: 13(खुशी, 1-पीसी’, 26’, 27’, 32’, 38’, 50, 59’; सानिका माने 3’, 49’; तनुश्री कडू 12’, 43’56’; संजना खेतवत 39’) विजयी वि. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हॉकी: 0. हाफटाईम: 5-0.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर