एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास (Lonavala Dam)पुढील काही तासांत लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. त्यानंतर धरणावरच्या सांडव्यातून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. परिसरातील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. लोणावळा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरत आहे. लोणावळा धरणाची पाणी पातळी 624.42 मीटर असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस लक्षात घेता पुढील 48 तासात धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.
लोणावळा धरणाच्या सांडव्यातून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळी त्यामुळे वाढ होईल. त्यामुळे इंद्रायणी नदी पाठच्या लोकांना खबरदारीचा आहे इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणी प्रवेश करू नये. नदीपात्रातील तत्सम साहित्य अथवा जनावरे तात्काळ हलविण्याचे आवाहन खोपली व भिवपुरी वीजकेंद्र प्रमुखांनी केले आहे.