एमपीसी न्यूज – मागील काही दिवसात मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात तालुक्यात 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहर आणि परिसरातील डोंगर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक गावांमधील रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत(Maval) झाले आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीने मावळ तालुका संपन्न आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगररांगा आहेत. या भागात कायम भरपूर पर्जन्यवृष्टी होते. जुलै महिन्यात मावळ तालुक्यात 787 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर गेल्या 24 तासात 122 मिलिमीटर पावसाची नोंद(Maval) झाली आहे.
Pimpri : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन
बुधवारी (दि. 24) सकाळी तालुक्यात सर्वत्र मुसळधार सरी कोसळल्या. दरम्यान मध्यरात्रीपासून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. मळवली परिसरात काही गावांमध्ये घरात पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तळेगाव मधील एका शाळेने सुट्टी जाहीर केली. शाळांना काही दिवस सुट्टी जाहीर करण्याची अनेक पालकांनी मागणी केली आहे.