मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर,पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य अविनाश बवरे मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर,गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, ज्येष्ठ नेते शत्रुघ्न धनवे, मा.अध्यक्ष किरण भिलारे,अनंता कुडे, मा.सरपंच नितीन कुडे , मा. नगरसेवक ॲड. विजयराव जाधव,प्रसाद पिंगळे,रवींद्र काकडे,भूषण मुथा,विकी म्हाळसकर, विषय साधन व्यक्ती सविता पाटील , शितल शिशुपाल, विशेष शिक्षक शकीला शेख, साधना काळे, सुमित्रा कचरे व डाटा एन्ट्री ऑपरेटर मनीषा कोकाटे(Maval) उपस्थित होते.
अंगदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी , मुकामार यावरील मलम , कापणे ,भाजणे आणि खरचटणे या वरील मलम , जखम निर्जंतुकीकरणासाठी अँटीसेप्टिक द्रव्य बाटली , थकवा अथवा शरीरातील पाणी कमी झाल्यास उपयुक्त असणारे ओ आर एस , बँडेड पट्ट्या, कापूस , व्हॅसलीन डबी, बँडेज , चिकट पट्टी, इ वस्तू तसेच या वस्तूंचा वापर कसा करावा याबाबत आणि सार्वत्रिक लसीकरणाचा तक्ता असलेले माहितीपत्रक एका पारदर्शक डब्यामध्ये असलेला व्यवस्थित संच असे या प्रथमोपचार संचाचे स्वरूप आहे.पंचायत समिती शिक्षण विभागाद्वारे अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांच्या माध्यमांतून प्रत्येक शाळांना हे प्रथमोपचार संच वाटप केले जाणार आहे.