एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. तालुक्याच्या (Maval )पश्चिम पट्ट्यातील भात शेतीची खाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील भात शेती पाण्यात गेली आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आले आहेत.
गेली तीन-चार दिवस मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचे प्रमाण मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जास्त आहे त्यामुळे या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेले आहे. तालुक्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. प्रचंड प्रमाणात तालुक्यातील नद्यांना मोठे पूर आले आहेत. पवना, इंद्रायणी, आंध्रा,कुंडलिका, सुधा या नद्यांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. तर पश्चिम पट्ट्यातील ओढे- नाले वाहात आहेत. काही ठिकाणी छोटे ब्रिज पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Pimple Saudagar : गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत केली फसवणूक
सोमवारपासून जोरदार मुसळधार पाऊस मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पडत असल्याने डोंगरी भागामध्ये असलेल्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर शासकीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम झालेला आहे. पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या भागातील विद्यार्थ्यांची संख्या फारच रोडावलेली आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टीही देण्यात आलेली आहे.
पवना धरण,वडिवळे धरण,आंद्रा धरण, जाधववाडी या धरणाच्या पाणी साठ्यात प्रचंड वाढ झाली असून कासारसाई,आढले,पुसाणे,मळवंडी ही धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत.
पुढील २४ तास मुसळधार
भारतीय हवामान विभाग पुढील २४ तासांत घाट परिसरात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस. पुणे, सातारा येथे मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.