Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 8:08 am

MPC news

Pimpri : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

एमपीसी न्यूज – भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे (Pimpri)म्होरके असल्याची टीका केल्यानंतर त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहा यांच्याविरोधात आंदोलन केले.

यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक सचिव प्रशांत सपकाळ, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, कैलास बनसोडे, विशाल जाधव, अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, विनोद धुमाळ, राहुल आहेर, काशिनाथ जगताप, हेमंत बलकवडे, ज्ञानेश्वर आल्हाट, संजय पडवळ, अनिल भोसले, राजू खंडागळे, सुनील कस्पटे, विशाल काळभोर, शादाब खान, सुनील लांडे, इखलास सय्यद, संदीप देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

PCMC : महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात बीट डेंग्यू अभियान

अमित शहा यांनी शरद पवार यांच्याबद्दल अतिशय खोटारडी व खालच्या पातळीवर टीका केली. देशाच्या गृहमंत्री पदावरील व्यक्तीने अशी टीका करणे निंदाजनक आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांचा त्यांनी अपमान केला आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही. अमित शहा यापुढे कधीही पुणे जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा जाहीर निषेध केला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर