Explore

Search
Close this search box.

Search

March 27, 2025 1:46 am

MPC news

Pruthviraj Sutar : कोथरूड विधानसभा मतदारसंघावर यंदा ठाकरे गटाचा भगवा फडकणारच; पृथ्वीराज सुतार यांचा निर्धार

एमपीसी न्यूज -लोकसभा निवडणूक  होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यानंतर प्रत्येक पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू केल्या आहेत. तर विद्यमान आणि इच्छुक नेते मंडळी देखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे.या सर्व घडामोडी दरम्यान पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून (Pune) आहे.

या मतदारसंघाचे भाजपचे नेते विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत.तर याच मतदारसंघातील माजी महापौर मुरलीधर मोहोळ खासदार म्हणून निवडून आले आणि केंद्रात मंत्री देखील झाले. त्याच मतदारसंघातील मेधा कुलकर्णी यांची राज्यसभा खासदार पदावर निवड करण्यात आली. या एकाच मतदारसंघात भाजपचे तीनही नेते मोठ्या पदावर आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपला सोपी मानली जात असताना या मतदार संघाचे ठाकरे गटाचे जेष्ठ नेते माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पुणे महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार (Pruthviraj Sutar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार या दोन्ही नेत्यांची भेट घेतली.या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या दोन्ही नेत्यांची भेटी घेतल्याने शहराच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली(Pune) आहे.

Pimpri-Chinchwad : संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे; महापालिकेचे आवाहन

 त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज सुतार (Pruthviraj Sutar) म्हणाले की,मागील 50 वर्षापासून आमचे कुटुंबीय कोथरूड भागात शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहे.या संपूर्ण कालावधीत माझे वडील शशिकांत सुतार यांनी नगरसेवक, आमदार, मंत्री या पदावर काम करून कोथरूड विभागाचा कायापालट केला.त्यांच्यानंतर मी नगरसेवक म्हणून काम केले.तर 2014 पर्यंत कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला.पण त्यानंतर आजपर्यंत भाजपचे (मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील) आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचे नेते मंडळी कोथरूड हा आमचा बालेकिल्ला म्हणत असतील,पण त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत.मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहिल्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील आणि कोथरूड विधानसभेवर ठाकरे गटाचा भगवा फडकणार, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे फोटो व्हायरल झाला.त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की,उद्धव ठाकरे यांच्याकडे कोथरूड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी,अशी मागणी केली.त्यानंतर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन जागा वाटपादरम्यान कोथरूड विधानसभा ठाकरे गटाला सोडण्यात यावी,अशी मागणी केली.तुम्ही काम करीत राहा,पक्ष योग्य तो निर्णय घेईल,असे दोन्ही नेत्यांनी भेटी दरम्यान सांगितले. आता यावर भाजप नेत्याकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर