एमपीसी न्यूज – आषाढी एकादशीचे औचित्य साधून इंद्रायणी महाविद्यालय (Talegaon Dabhade) आयोजित व आवर्तन संस्था प्रस्तुत ‘इंद्रायणी संगे अभंग रंगे’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कांतीलाल शहा शाळेच्या सभागृहात शनिवारी (दि. 20) कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयातर्फे दिंडीचे आयोजन करण्यात आले.
अभंगवणीच्या कार्यक्रमात पंडित विनोदभूषण आल्पे, धनश्री शिंदे व डॉ. प्राची पांडे यांनी एकापेक्षा एक असे सुरेख अभंग सादर केले. पुण्य परोपकार, इंद्रायणी काठी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,ज्ञानियांचा राजा,अरे अरे ज्ञाना झालासी पावन,अवघे गरजे पंढरपूर असे एकाहून अधिक व सुरेख अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. प्रिया करंदीकर – घारपुरे (संवादिनी), मंगेश राजहंस,अनिरुद्ध जोशी (तबला), योगिराज राजहंस (तालवाद्य) यांनी तेवढ्याच ताकदीने साथसंगत केली. विराज सवाई यांनी निरूपण केले.
यावेळी इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे,डी फार्मसीचे प्राचार्य प्रा. गुलाब शिंदे,उपप्राचार्य एस. पी. भोसले, गोरख काकडे तसेच आवर्तन संस्थेचे संचालक मंगेश राजहंस तसेच सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो भजे हरी को सदा या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
Maharashtra : दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू
ध्वनी संयोजन केदार अभ्यंकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले.