एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात वराळे येथील मुस्लीम कुटुंबातील महिलेचा संशयास्पद मृत्यू (Varale murder) व तिच्या दोन लहान मुलांच्या हत्याकांडाचा मावळ तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मावळ तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त व मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यात घडलेल्या संतापजनक घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. तपास यंत्रणेत कोणाचाही हस्तक्षेप न करता आरोपीना फाशीची ( Varale murder accused) शिक्षा देऊन संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे.
Pavana Dam Update: पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम; पाणीसाठा 54 टक्के!
प्रसंगी मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष अयुबभाई शिकीलकर, ॲड. रियाज तांबोळी, पीडित मुलीचे वडील गुलाम कादर, शहानूर मुलानी, नदीम शेख, मुनीर बेग, सुलेमान कुरेशी, रियाज शेख, साजिदभाई शेख, सोहेल शिकीलकर, मन्सूर शहा, एजाज शिकीलकर, नदीम शेख नालबंद, शहादत सय्यद आदी उपस्थित होते.